Submit your work, meet writers and drop the ads. Become a member
जन्म दिलास तूच मला,
आणि तूच मला वाढविलं,
सोनेरी दागिन्यासारखं एकदम
तूच मला घडविलं.

कधी चुकलो तर ओरडलीस मला,
कधी प्रेमाने जवळ घेतलंस,
कधी लागेल असं बोललीस मला,
कधी काळजीने पांघरूण घातलंस.

झेलल्यास माझ्या अडचणी
स्वतःवर तू सर्व,
आईसारखं नातं बनवणारा
थोडाच आहे तो निसर्ग.

कितीही काहीही झालं तरी
नाही देणार मी तुला अंतर,
आयुष्याच्या शेवटपर्यंत तुझ्यावर
प्रेम करीन मी निरंतर.
ही कविता ०६ जून २०२० रोजी लिहिलेली आहे
समुद्रासारखं आहे आयुष्य –
कधी आनंदाची लाट, कधी दुःखाची सर.
रस्त्यासारखं आहे आयुष्य –
कधी अपयशाचा खड्डा, कधी यशाची भर.

आकाशासारखं आहे आयुष्य –
कधी स्वच्छ सोपं, कधी दाट अवघड.
शाळेतल्या वर्गासारखं आहे आयुष्य –
कधी स्मशान शांतता, कधी खूप बडबड.

आयुष्याच्या या तुलनांचा
खूप गहन अभ्यास करावा,
परिस्थितीच्या अटी पाहून मगच
आयुष्याचा फॉर्म भरावा.
ही कविता १२ जून २०२० रोजी लिहिलेली आहे
आहे मन हावरट, हवं त्याला सगळं,
संसाराच्या मोहात अडकले ते आगळं.

मित्रदेखील हवेत त्याला,
मैत्रिणीदेखील हव्या,
Relation मध्ये येऊ
अशा आशा नव्या-नव्या.

मान-सन्मान हवा,
वाहवाही हवी त्याला,
पण हवंय सगळं फुकट –
मेहनत करायची कशाला?

Materialistic मोह
त्याला आवरत नाही,
आयपत नसेल तरी मोठी गाडी घेऊ –
हरकत नाही काही.

हावरटपणाच्या या विळख्यात गुरफटून मन जाते,
आयुष्याचा शेवट मात्र फक्त राख उरते.
ही कविता १३ मार्च २०२४ रोजी लिहिलेली आहे
शब्द वापरून वाक्य बनवली जातात,
वाक्य वापरून मनातील भाव मांडले जातात.
एकेकाळी मी ज्यांच्याशी तासंतास बोलायचो,
ते आजकाल फक्त कामासाठी phone करतात.

Priority नाही आहे मी कोणाची,
फक्त एक option म्हणून उरलोय आता.
आयुष्याच्या झाडाची टवटवीत फुलं
कोमेजलेली दिसतात येताजाता.

आजकाल काही share केलं जात नाही,
WhatsApp ग्रुप्सला कधी add केलं जात नाही.
लोक भरपूर आहेत आजूबाजूला –
मित्र तर नाहीत, पण आठवणी उरल्यात काही.

मला मान्य आहे की मी आहे एक failure,
नाही जमल्या मला काही गोष्टी करायला.
आयुष्याच्या या सांडलेल्या कचऱ्याला
मला एकट्यालाच लागेल भरायला.
ही कविता १३ नोव्हेंबर २०२२ रोजी लिहिलेली आहे
तू दिसतेस मला एका फुलासारखी,
वेगवेगळ्या रंगांनी बहरलेली
तू दिसतेस मला एका ताऱ्यासारखी,
दूर आकाशात टीमटीमणारी

प्रेम आहे माझे तुझ्यावर,
तुला माहीत नाही
तू आणि फक्त तूच दिसतेस,
इतर काहीच दिसत नाही

एक दिवस विचारेन तुला —
"माझ्याशी लग्न करशील का?"
तेव्हा तू म्हणू नकोस की,
"माझ्या आयुष्यातून निघून जा"

नाही जगू शकणार तुझ्याशिवाय,
जाईन मी मरून
पण आठवणी मात्र राहतील तुझ्या,
मनात घर करून

तू सुखी राहावीस,
हीच असेल माझी शेवटची इच्छा
तुझ्या सुखी जीवनाला,
माझ्याकडून शुभेच्छा
ही कविता १४ फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे.
कशात हुडकावा आनंद
हे आजकाल कळेनासं झालंय,
आनंदी राहायचं कारण
आजकाल मिळेनासं झालंय.

जुने दिवस आठवावे म्हणतो,
जरा भावनिक होईन म्हणतो...
पण मग पडतो प्रश्न येऊन –
की भावना तरी उरल्यात का आता?
आश्रू अनावर व्हायला,
ते अश्रू तरी उरलेत का आता?

प्रेमाला शोधायच्या आशेने
आयुष्याच्या जंगलात भटकतो,
खोट्या आशेच्या नदीत
थोडा वेळ पहुडतो.
पण होईन का मी ओला प्रेमाने त्या नदीत?
का होईल मला भास,
आणि पडेन मी दुःखाच्या दरीत?
का दिसेल मला मृगजळ
त्या भाबड्या, प्रेमळ हरणाचं?

जाऊदे ते सगळं –
मी जाऊन काहीतरी खातो,
पाणीपुरीतलं पाणी
जरा मिटक्या मारत पितो.
पण मग येतं डाएट आडवं
आणि दाखवतं जाडी माझी –
"३६ ची पॅन्ट घालायची लायकी आहे का तुझी?
पोटावर पडल्यात वळ्या,
आणि गाल झालेत गुबगुबीत,
हत्ती सारखे पाय तुझे,
शरीर दिसतंय बटबटीत!"

मग आठवतं मला करिअर,
आणि मिळवू म्हणतो पैसा...
करिअरच्या टेन्शनने
क्षीण होऊन जातो नाहीसा.
इतके श्रीमंत होऊ की
असेल बंगला, गाडी,
भरपूर फ्लॅट घेऊ,
महिन्याला येतील भाडी.
पण तिथे तरी हा माजोर्डा रूबाब
देईल का मला सुख?
आणि एवढं सगळं करून शेवटी मला
राहील का आनंदाची भूक?

कशात हुडकावा आनंद?
हे आजकाल कळेनासं झालंय...
आनंदी राहायचं कारण
आजकाल मिळेनासं झालंय.
ही कविता २८ मे २०२५ रोजी लिहिलेली आहे
काश उस दिन उसका भी कोई भाई होता,
आज वो सितारा हमारे बीच ज़िंदा होता।
काश कोई उसे जाकर बचा लेता,
कम से कम उसका तो ख़ून न बहता।

नरभक्षी भेड़ियों ने ली थी उसकी जान,
छोड़ा था उसे वहीं तड़पता, लहूलुहान।
चिल्लाती रही वो उसी जगह पर,
न जाने कितने ही जुल्म हुए थे उस पर।

नारी को निर्वस्त्र करने का परिणाम –
इस भूमि ने महाभारत देखा था।
धिक्कार है ऐसे समाज पर –
उसी भूमि ने आज यह अपराध देखा था।

जल रही हैं मोमबत्तियां शोक व्यक्त करने,
आंदोलन कर रहे हैं लोग और दे रहे हैं धरने।
क्या इस बार होगा उन दरिंदों पर कठिन शासन,
या फिर एक बार उभरेगा एक नया दुःशासन?
यह कविता १९ अगस्त २०२४ को लिखी गई है
वाट पाहिलेली तिजी मी,
पण ती नाही आली
खिडकीत दिसलेली ती शेवटची,
परत दिसलीदेखील नाही

कित्तीएक वर्षं गेली आता,
आता गेलाय खूप काळ
तिच्या आठवणींचा मात्र,
मी केलाय सांभाळ

कुठे असेल आत्ता ती?
ह्या प्रश्नानं दिला त्रास
चेहऱ्यावर आहे हसू,
पण आतून आहे मी उदास

विचारलेलं तिच्याबद्दल,
चौकशी खूप केलेली
कुणास ठाऊक, कुठल्या शहरात,
होती ती हरवलेली

तिच्या आठवणीने खूप त्रासलोय,
नाही मला सुचत काही
म्हणूनच कदाचित परत विचारतोय —
कुठे असेल आत्ता ती??
ही कविता ०४ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
चढण्याची केली घाई,
कुठे हरवला आनंद माझा
मलाच कळालं नाही.

स्वप्नं मोठी, इच्छा जास्त –
पण मेहनत केली नाही,
कुठे हरवला आनंद माझा
मलाच कळालं नाही.

सर्वांनी मला सावध केलेले,
पण मी लक्ष दिलं नाही,
कुठे हरवला आनंद माझा
मलाच कळालं नाही.

मेहनतीशिवाय मार्ग मला
कोणताच दिसत नाही,
हरवलेला आनंद माझा
मी पुन्हा शोधत राही.
ही कविता ०२ ऑगस्ट २०२० रोजी लिहिलेली आहे
जगात एकटेच येता,
जगातून एकटेच जाता,
मग आयुष्यात तुम्ही कोणावर
कशाला अवलंबून राहता?

इथं कोणीच नसतं कोणाचं,
"तो आहे माझा..." असं फक्त म्हणायचं,
मदतीला मात्र कोणीही येत नाही,
सगळे बघतात फक्त आपल्याच फायद्याचं.

जग आहे अतिशय वाईट,
सगळेच म्हणतात "नो मोअर फाईट",
मग समोर येतात वाईट बातम्या –
"... वॉस किल्ड लास्ट नाईट."

बायकांना दिला जातो त्रास,
लोकांना मारणं समजलं जातं खास,
कधी वाटतं संपून जावं सगळं,
थांबून जावा एकसाथ सगळ्यांचा श्वास.
ही कविता १८ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
ओ मेरे मितवा,
मुझसे रूठो ना रे तुम।
मुझे प्यार हुआ है तुमसे,
तुझमें हो गए हैं गुम।

ख़ुदा से माँगी है एक दुआ –
मेरा प्यार तुम तक पहुँचा देना।
मिल गए तुम इस ज़िंदगी में,
तो फिर और क्या है पाना?

फ़ासले हमारे बीच के
चुभ रहे हैं अब मुझे,
बेसब्र हो गई हूँ अब
मिलने के लिए मैं तुझे।

इज़हार न कर पाई मैं
तुमसे अपने प्यार का,
बयान न कर सकी मैं
दिल से की मोहब्बत का।

इस प्यार की चुनौती में,
ऐ ख़ुदा, तुम मेरा साथ देना।
रूठा है वो मुझसे –
उसे कैसे भी है मनाना।
यह कविता १२ अप्रैल २०२४ को लिखी गई है
"गो कोरोना" म्हणत म्हणत,
आले रस्त्यावर आठवले
शाळांना सुट्ट्या दिल्यानंतर,
सगळ्यांनी गाव गाठले

सरकारने केलं आव्हान सर्वांना —
"घराबाहेर पडू नका!"
बाहेर पडायचंच असेल तुम्हाला,
चेहरा तुमचा मास्कने झाका

मुंबईत झाली जमावबंदी,
झाले सगळे सोहळे रद्द
गर्दीत प्रवास करायला लोकांना,
लावण्यात आले निर्बंध

झाली बंद थिएटर, जिम,
लोकं राहायला लागली घरात
कोरोनाला रोखण्यासाठी मात्र,
तयारी चाललीये जोरात

कोरोनाने पाडलं स्टॉक मार्केट,
सोन्याचे भाव पण पडले
लोकांच्या भीतीमुळे मात्र,
मास्कचे भाव वाढले

कोणाचे गेले आईवडील,
कोणी पाहिलं मुलाला मरताना
कोरोनाच्या विळख्यातून वाचव —
हीच देवाचरणी प्रार्थना
ही कविता १६ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
काश वक़्त को थामना संभव होता,
मैं हमेशा के लिए वक़्त रोक देता।
ज़िंदगी के उस पल को, मैं
थोड़ी और देर जी लेता।

काश अपने दुख बाँटने को
कोई अपना साथ होता,
ज़िंदगी का यह सफ़र
थोड़ा आसान बन जाता।

हमेशा अपने सामने की आवाज़ सुनो,
सामने हर कोई अच्छा बोलता है।
पीछे की आवाज़ को सिर्फ़ अकेले में सुनना –
दर्द का अहसास एक झटके में मिलता है।

कभी अपने कर्म को मत रोकना,
लोगों का काम तुम्हें बुरा-भला ही कहना है।
अपने खराब नसीब के लिए तो
हर कोई भगवान को भी कोसता है।
यह कविता २२ जनवरी २०२२ को लिखी गई है
देव भेटला तर विचारेन त्याला –
तू ही सृष्टी बनवलीच कशाला?
का बनवलास तू हा सूर्य,
आणि का बनवलीस ही ग्रहमाला?

का पाणी तू निळंच बनवलंस,
का चंद्राला ठेवलास पांढरा?
आणि का आहेत हिरवी झाडं,
अन् का केशरी भंडारा?

का पृथ्वी सर्वात वेगळी?
का फक्त मानवच हुशार?
का मानव एवढा क्रूर,
आणि का प्राणी लाचार?

का मनुष्याने केली प्रगती?
का बदलली ही दुनिया सारी?
स्वतःला संपवण्याची करत आहे का
स्वतःच मनुष्य तयारी...?
ही कविता १० एप्रिल २०२० रोजी लिहिलेली आहे
कसं सांगू तुला,
मनात काय चाललंय
ज्वालामुखीचा उद्रेक झालाय,
सारं आभाळ फुटलंय

भावना पुरात गेल्यात वाहून,
प्रेमाचा पडलाय दुष्काळ
द्वेषाच्या वादळाच्या थैमानाने,
दुःखाचा पडलाय सुकाळ

तू नाकारून मला,
खूप मोठी चूक केलीस
माझ्या प्रेमाच्या चिंध्या करून,
तू निघून गेलीस

दुःखाच्या वादळाचा झटका,
नक्कीच बसेल तुला
आयुष्यात द्वेषाच्या सुनामीनंतर,
प्रेमाचं महत्त्व कळेल तुला
ही कविता ०६ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
बोलताना तुझ्याशी भान मी हरपलो,
तुला बघायला दररोज मी तरसलो.
भेटशील तू मला, ही आशा मनात होती,
पण भेटायला तुला योग्य संधी मिळत नव्हती.

मी मारलेल्या जोकवर तुझं खदखदून हसणं,
तू दिलेल्या सरप्राइजनं माझं आश्चर्यचकित होणं,
मी दुःखी असताना तुझे डोळे पाणावणं,
तू अडचणीत असताना माझं मदतीस सरसावणं.

आठवण येत होती मला कायम ह्या सगळ्याची,
पण तुझी सावलीदेखील माझ्या आसपास नसायची.
कायम मी जगायचो तुझ्या आठवणींमध्ये,
कायम मी बघत राहायचो तुझ्या फोटोकडे.

परत सोडून गेलीस तर जगणं अशक्य होईल मला,
माझ्या मनातली ही भावना मी कशी सांगू तुला?
कदाचित देवानेच आहे आपलं कनेक्शन जोडलेलं,
कारण नातं आहे आपलं शब्दांच्या पलीकडचं.
ही कविता ०२ जुलै २०२० रोजी लिहिलेली आहे
शब्दांना फोडणी लाऊनी
बनते आयुष्याचं भोजन,
भावनांच्या मसाल्याला
टाकायचं त्यात प्रयोजन.

कधी रागाचा लाल खरडा,
तर कधी आनंदाची खीर,
थोडं मजेदार आंबट लोणचं,
त्यात रुसलेल्या रसगुल्याची भिरभिर.

एक कौतुकाचा लाडू, अन
थोडी लहरी असलेली कोशिंबीर,
त्यात समाधानाच्या भातावर
आमटी बसलेली गंभीर.

भावनांच्या या जेवणाने
भरतं ताट आयुष्याचं,
पण सर्व पदार्थ खाण्याआधी
प्यावं पाणी प्रेमाचं.
ही कविता ३० एप्रिल २०२१ रोजी लिहिलेली आहे
मन भरून आले तुला पाहून,
आठवण येत होती तुझी.
तुला सांगायचं गेले राहून
मनातली गोड भावना माझी.

सुंदर दिसत होतीस तू,
नेहेमीसारखीच हसत होतीस,
पण तुझ्या हसण्याचा आनंद तू
मला मिळून देत नव्हतीस.

खूप समजावलं मी मनाला माझ्या –
नको तिची आठवण काढूस,
आठवणींच्या पेटाऱ्याला तुझ्या
पाहून नको अश्रू गाळूस.

पण तरीही, कधीतरी दार वाजल्यावर
तू भेटायला आलीयस असं वाटतं,
दारात कोणी तरी दुसराच दिसल्यावर
मन पुन्हा एकदा तुटतं.
ही कविता ०५ जून २०२० रोजी लिहिलेली आहे
मनातल्या कोपऱ्यात आहे
आठवणींचा ठेवा,
ती बरोबर असण्याचा आनंद
त्यांच्याच मदतीने घ्यावा.

प्रेमात कायम जवळ असणं
हे गरजेचं नसतं,
लांब असूनदेखील मला
ओढ तुझीच असते.

सतत तुझा वाटतो अभिमान,
आनंददेखील होतो,
पण एकत्र आनंद साजरा करण्याचा
मोका माझ्याकडे नसतो.

माझी काळजी करू नकोस
असं मी कायम तुला सांगतो,
तुझ्या काळजीत मात्र मी
माझा प्रत्येक क्षण काढतो.
ही कविता २४ जून २०२० रोजी लिहिलेली आहे
आयुष्य आहे एक कोडे,
रोज आपण सोडवू थोडे
प्रश्न पडतील दररोज वेगळे,
विचार करून सोडवू सगळे

अडचणींना आपण सामोरे जाऊ,
कष्टाचीच आपण भाकर खाऊ
मेहनत करून दररोज थोडी,
वाढवू आपण आयुष्यातील गोडी

नव्या दिशा, नव्या वाटा,
येतील अडचणींच्या अनेक लाटा
मात करून अडचणींवर,
नंतर येईल सुखाची सर

जरी आल्या अनेक दुविधा,
उपाय मात्र असेल साधा
मेंदू चालवून विचार करा,
आनंदी राहण्यासाठी कष्ट करा
ही कविता १३ फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे
शाळेच्या पहिल्या दिवशी न्हवती अक्कल
लावता येत न्हवते साधे चड्डीचे बक्कल
तरी निघालो शाळेला वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर
हातात बाटली, खिशात रुमाल, आणि पाठीवर दप्तर

शाळेत अनेक गोष्टी शिकलो
इंग्रजीतली ABCD शंभरदा घोकलो
मार्क्स मात्र सर्वांना हवे होते पुरे
रट्टा मारून केलेल्या अभ्यासाने मेंदू मात्र कोरे

दिवस गेले, महिने गेले, गेली खूप वर्षं
दहावी आली हे कळताच गेला जेवणातील सर्व हर्ष
दहावीबद्दल घातली सर्वांनी मनात भीती
घरचे म्हणाले, "अभ्यास कर, आपली नाही शेती"

अभ्यास केला दिवस आणि रात्र
MARKS च्या नादात विसरलो सारे मित्र
सोडवले प्रॅक्टिस पेपर्स आणि लिहिलेली जर्नल्स सर्व
अभ्यास पूर्ण झाल्याचा मात्र अजिबात नव्हता गर्व

परीक्षा दिली, RESULT आला
सर्व मित्रांना फोन केला
मार्क्स मला चांगले पडलेले
CONGRATS च्या मेसेजने सर्व CHATS भरलेले

मार्क्स चांगले मिळाल्याने चांगल्या कॉलेजमध्ये झाली ADMISSION
कोणी IAS तर कोणी ठेवलेलं ENGINEERING चं VISION
कॉलेजच्या पहिल्या दिवशी वाटलं की आपल्या कडे होती खूप सारी अक्कल
कारण माझेच मी लावलेले माझ्या चड्डीचे बक्कल...
ही कविता १२ फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे.
एक काळ होता जेव्हा
मी वर्गात पहिला यायचो,
सगळ्यात A ग्रेड मिळवायचो तेव्हा,
आनंदाने पेढा खायचो

शिकवलेले कळायचे मला सगळं,
विषय सगळे आवडायचे
खेळ खेळायचो वेगवेगळे,
शिक्षक सर्व मुलांना घडवायचे

आज मी वर्गात पहिला येत नाही,
नाही खात मी पेढा
शिकवलेलं कळत नाही काही,
कमी गुणांनी घातलाय वेढा

विषय नाहीत आवडत मला,
कलेला नाही आहे वाव
शिक्षक डोकं खातात साला,
फक्त मार्कांनाच आहे भाव

पण येतील ते दिवस पुन्हा,
जेव्हा मीच पहिला येईन
खूप गुण मिळतील तेव्हा,
मी पुन्हा पेढा खाईन

चारही बाजूंनी असेल वाहवा माझी,
खूप मोठं असेल माझं नाव
कीर्ती पसरलेली असेल माझी अशी,
की असेल फक्त माझाच बडेजाव
ही कविता २० फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे.
विश्वासाने बनते नाते,
नाते असते माणुसकीचे,
नाते असते प्रेमाचे तर,
नाते असते आपुलकीचे.
नात्यामध्ये नसते खोट,
नात्यामध्ये असतो विश्वास,
एकमेकांचे हात धरुनी
करूया आयुष्याचा प्रवास.

मदत करूया एकमेकांची,
सांभाळून घेऊ आपण चुका,
अडचणींच्या सागरातून होईल
पार संसाराची नौका.
अडचणींवर मात करुनी
घेऊया सुटकेचा निश्वास,
प्रेमाच्या सरी कोसळतील जर
तुझा असेल माझ्यावर विश्वास.
ही कविता २० मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे

— The End —