Submit your work, meet writers and drop the ads. Become a member
वाट पाहिलेली तिजी मी,
पण ती नाही आली
खिडकीत दिसलेली ती शेवटची,
परत दिसलीदेखील नाही

कित्तीएक वर्षं गेली आता,
आता गेलाय खूप काळ
तिच्या आठवणींचा मात्र,
मी केलाय सांभाळ

कुठे असेल आत्ता ती?
ह्या प्रश्नानं दिला त्रास
चेहऱ्यावर आहे हसू,
पण आतून आहे मी उदास

विचारलेलं तिच्याबद्दल,
चौकशी खूप केलेली
कुणास ठाऊक, कुठल्या शहरात,
होती ती हरवलेली

तिच्या आठवणीने खूप त्रासलोय,
नाही मला सुचत काही
म्हणूनच कदाचित परत विचारतोय —
कुठे असेल आत्ता ती??
ही कविता ०४ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
एक काळ होता जेव्हा
मी वर्गात पहिला यायचो,
सगळ्यात A ग्रेड मिळवायचो तेव्हा,
आनंदाने पेढा खायचो

शिकवलेले कळायचे मला सगळं,
विषय सगळे आवडायचे
खेळ खेळायचो वेगवेगळे,
शिक्षक सर्व मुलांना घडवायचे

आज मी वर्गात पहिला येत नाही,
नाही खात मी पेढा
शिकवलेलं कळत नाही काही,
कमी गुणांनी घातलाय वेढा

विषय नाहीत आवडत मला,
कलेला नाही आहे वाव
शिक्षक डोकं खातात साला,
फक्त मार्कांनाच आहे भाव

पण येतील ते दिवस पुन्हा,
जेव्हा मीच पहिला येईन
खूप गुण मिळतील तेव्हा,
मी पुन्हा पेढा खाईन

चारही बाजूंनी असेल वाहवा माझी,
खूप मोठं असेल माझं नाव
कीर्ती पसरलेली असेल माझी अशी,
की असेल फक्त माझाच बडेजाव
ही कविता २० फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे.
तू दिसतेस मला एका फुलासारखी,
वेगवेगळ्या रंगांनी बहरलेली
तू दिसतेस मला एका ताऱ्यासारखी,
दूर आकाशात टीमटीमणारी

प्रेम आहे माझे तुझ्यावर,
तुला माहीत नाही
तू आणि फक्त तूच दिसतेस,
इतर काहीच दिसत नाही

एक दिवस विचारेन तुला —
"माझ्याशी लग्न करशील का?"
तेव्हा तू म्हणू नकोस की,
"माझ्या आयुष्यातून निघून जा"

नाही जगू शकणार तुझ्याशिवाय,
जाईन मी मरून
पण आठवणी मात्र राहतील तुझ्या,
मनात घर करून

तू सुखी राहावीस,
हीच असेल माझी शेवटची इच्छा
तुझ्या सुखी जीवनाला,
माझ्याकडून शुभेच्छा
ही कविता १४ फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे.
आयुष्य आहे एक कोडे,
रोज आपण सोडवू थोडे
प्रश्न पडतील दररोज वेगळे,
विचार करून सोडवू सगळे

अडचणींना आपण सामोरे जाऊ,
कष्टाचीच आपण भाकर खाऊ
मेहनत करून दररोज थोडी,
वाढवू आपण आयुष्यातील गोडी

नव्या दिशा, नव्या वाटा,
येतील अडचणींच्या अनेक लाटा
मात करून अडचणींवर,
नंतर येईल सुखाची सर

जरी आल्या अनेक दुविधा,
उपाय मात्र असेल साधा
मेंदू चालवून विचार करा,
आनंदी राहण्यासाठी कष्ट करा
ही कविता १३ फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे

— The End —