विश्वासाने बनते नाते, नाते असते माणुसकीचे, नाते असते प्रेमाचे तर, नाते असते आपुलकीचे. नात्यामध्ये नसते खोट, नात्यामध्ये असतो विश्वास, एकमेकांचे हात धरुनी करूया आयुष्याचा प्रवास.
मदत करूया एकमेकांची, सांभाळून घेऊ आपण चुका, अडचणींच्या सागरातून होईल पार संसाराची नौका. अडचणींवर मात करुनी घेऊया सुटकेचा निश्वास, प्रेमाच्या सरी कोसळतील जर तुझा असेल माझ्यावर विश्वास.