शाळेच्या पहिल्या दिवशी न्हवती अक्कल
लावता येत न्हवते साधे चड्डीचे बक्कल
तरी निघालो शाळेला वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर
हातात बाटली, खिशात रुमाल, आणि पाठीवर दप्तर
शाळेत अनेक गोष्टी शिकलो
इंग्रजीतली ABCD शंभरदा घोकलो
मार्क्स मात्र सर्वांना हवे होते पुरे
रट्टा मारून केलेल्या अभ्यासाने मेंदू मात्र कोरे
दिवस गेले, महिने गेले, गेली खूप वर्षं
दहावी आली हे कळताच गेला जेवणातील सर्व हर्ष
दहावीबद्दल घातली सर्वांनी मनात भीती
घरचे म्हणाले, "अभ्यास कर, आपली नाही शेती"
अभ्यास केला दिवस आणि रात्र
MARKS च्या नादात विसरलो सारे मित्र
सोडवले प्रॅक्टिस पेपर्स आणि लिहिलेली जर्नल्स सर्व
अभ्यास पूर्ण झाल्याचा मात्र अजिबात नव्हता गर्व
परीक्षा दिली, RESULT आला
सर्व मित्रांना फोन केला
मार्क्स मला चांगले पडलेले
CONGRATS च्या मेसेजने सर्व CHATS भरलेले
मार्क्स चांगले मिळाल्याने चांगल्या कॉलेजमध्ये झाली ADMISSION
कोणी IAS तर कोणी ठेवलेलं ENGINEERING चं VISION
कॉलेजच्या पहिल्या दिवशी वाटलं की आपल्या कडे होती खूप सारी अक्कल
कारण माझेच मी लावलेले माझ्या चड्डीचे बक्कल...
ही कविता १२ फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे.