आयुष्य आहे एक कोडे,
रोज आपण सोडवू थोडे
प्रश्न पडतील दररोज वेगळे,
विचार करून सोडवू सगळे
अडचणींना आपण सामोरे जाऊ,
कष्टाचीच आपण भाकर खाऊ
मेहनत करून दररोज थोडी,
वाढवू आपण आयुष्यातील गोडी
नव्या दिशा, नव्या वाटा,
येतील अडचणींच्या अनेक लाटा
मात करून अडचणींवर,
नंतर येईल सुखाची सर
जरी आल्या अनेक दुविधा,
उपाय मात्र असेल साधा
मेंदू चालवून विचार करा,
आनंदी राहण्यासाठी कष्ट करा
ही कविता १३ फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे