कसं सांगू तुला,
मनात काय चाललंय
ज्वालामुखीचा उद्रेक झालाय,
सारं आभाळ फुटलंय
भावना पुरात गेल्यात वाहून,
प्रेमाचा पडलाय दुष्काळ
द्वेषाच्या वादळाच्या थैमानाने,
दुःखाचा पडलाय सुकाळ
तू नाकारून मला,
खूप मोठी चूक केलीस
माझ्या प्रेमाच्या चिंध्या करून,
तू निघून गेलीस
दुःखाच्या वादळाचा झटका,
नक्कीच बसेल तुला
आयुष्यात द्वेषाच्या सुनामीनंतर,
प्रेमाचं महत्त्व कळेल तुला
ही कविता ०६ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे