"गो कोरोना" म्हणत म्हणत,
आले रस्त्यावर आठवले
शाळांना सुट्ट्या दिल्यानंतर,
सगळ्यांनी गाव गाठले
सरकारने केलं आव्हान सर्वांना —
"घराबाहेर पडू नका!"
बाहेर पडायचंच असेल तुम्हाला,
चेहरा तुमचा मास्कने झाका
मुंबईत झाली जमावबंदी,
झाले सगळे सोहळे रद्द
गर्दीत प्रवास करायला लोकांना,
लावण्यात आले निर्बंध
झाली बंद थिएटर, जिम,
लोकं राहायला लागली घरात
कोरोनाला रोखण्यासाठी मात्र,
तयारी चाललीये जोरात
कोरोनाने पाडलं स्टॉक मार्केट,
सोन्याचे भाव पण पडले
लोकांच्या भीतीमुळे मात्र,
मास्कचे भाव वाढले
कोणाचे गेले आईवडील,
कोणी पाहिलं मुलाला मरताना
कोरोनाच्या विळख्यातून वाचव —
हीच देवाचरणी प्रार्थना
ही कविता १६ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे